पाकचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला

शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (11:41 IST)
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा भारताने काढला असल्याची घोषणा अर्धमं‍त्री अरुण जेटली यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली असून पुलवामाच्या दहशतवादी हल्लचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे संकेतही जेटलींनी दिले आहेत.
 
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर कसे द्यावे या संदर्भात उच्च सुरक्षा समितीची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, अर्थमंत्री जेटली, संरक्षणंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि इतर दिग्गज सहभागी झाले होते. ही बैठक संपल्यावर अर्थमंत्री जेटलींनी पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढला आहे असे स्पष्ट केले आहे.
 
हा दर्जा जागतिक व्यापार संघटनेच्या नियांनुसार आर्थिकदृष्ट्या मागास व्यापारी सहयोगींना देण्यात येतो. भारताने हा दर्जा पाकिस्तान, व्हिएतनाम आणि बांगलादेश या तीन राष्ट्रांना दिला होता. या दर्जामुळे हे देश व्यापारासाठी महत्त्वाचे ठरत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती