राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सर्वोच्च पद्म पुरस्कारांचे वितरण केले. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात ज्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री दिले जातात. दरवर्षी राष्ट्रपतींकडून काही खास व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. यावेळी एकूण १३९ व्यक्तिमत्त्वांना या सन्मानाने सन्मानित केले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पद्म पुरस्कारांसाठी एकूण १३९ व्यक्तींची नावे निवडण्यात आली. तसेच एकूण १३९ पद्म पुरस्कारांचे वितरण केले गेले. ज्यामध्ये ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यासोबतच, या १३ व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर हा सन्मान देण्यात येत आहे. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये, २३ महिलांसह १० परदेशी, अनिवासी भारतीय आणि ओएसआय श्रेणीतील व्यक्तींना सन्मानित केले.