10 लाख लोकं 7 किमी लांब रस्त्यावर भोजन करतील, 10 हजार लोक वाढतील

सोमवार, 2 मार्च 2020 (15:46 IST)
इंदूर- श्री पितरेश्वर हनुमान धाम येथील नगर भोज 3 मार्च रोजी होणार आहे. येथे सुरू अतिरुद्र महायज्ञामध्ये 24 लाख आहुती पूर्ण झाल्यावर देवाला नैवेद्य अर्पित केलं जाईल. नंतर संध्याकाळी 4 वाजे पासून नगर भोज सुरू होईल. 
 
नगर भोज बडा गणपतीच्या जवळून ते पितरेश्वर हनुमान धाम पर्यंतच्या सुमारे सात किमीहून अधिक लांब रस्त्याच्या एका बाजूला ठेवण्यात येईल. भोजनासाठी पुरी, भाजी, नुक्ती आणि इतर पदार्थ तयार केले जातील. 
 
आयोजनाशी जुळलेले आमदार रमेश मेंदोला आणि शिव महाराज यांनी सांगितले की नगर भोज 10 लाख लोकांसाठी आयोजित करण्यात येत आहे. आयोजनामध्ये गुजरात, रतलाम, राजस्थान, इंदूरचे केटरर्स भोजन तयार करण्याचे काम करतील. आयोजनात ट्रॅफिक आणि सफाईचं विशेष लक्ष दिलं जाईल. रस्त्याच्या एका बाजूला भोज तर दुसर्‍या बाजूला ट्रॅफिक सुरू राहील. ट्रॅफिक व्यवस्थेसाठी एका खाजगी कंपनीच्या 500 लोकांसोबतच धामशी जुळलेले शेकडो भक्त याकडे लक्ष देतील. 
 
या व्यतिरिक्त सफाईसाठी देखील नगर निगमची मदत घेतली जाईल. सोबतच कार्यकर्ता देखील सफाईकडे लक्ष देतील. 
 
संध्याकाळी 4 वाजे पासून सुरू होणार्‍या या आयोजनात जेवण वाढण्यासाठी दहा हजार लोकांची व्यवस्था केली गेली आहे. यात एक हजार महिला देखील सामील आहेत. आयोजनात सामील होण्यासाठी जवळपासच्या गावाहून गाड्यांमधून भक्तांना आणण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे. 
 
भोजासाठी लागणारी सामुग्री
1000 क्विंटल आटा
2000 डबे शुद्ध तूप 
100 टंकी तेल
500 क्विंटल बेसन
500 क्विंटल बटाटे 
500 क्विंटल इतर भाज्या 
 
प्रत्येक केटररकडे 500 लोकांची टीम
हंसदास मठ, नृसिंह वाटिका, व्यास बगीची, एचपी गोदामजवळ सामुदायिक परिसर, मेहंदी परिसर, पंचशील नगर, बिजासन मंदिर, गोम्मटगिरी, गांधी नगर आणि श्री पितरेश्वर हनुमान धाममध्ये भोजनशाळा तयार केल्या जाता आहे. भोजन तयार करण्यासाठी प्रमुख दहा केटरर असतील. प्रत्येक केटररकडे 500 लोकांची टीम असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती