घरात लग्न असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. घरात संगीत डान्स सुरु होते. सर्व जण आनंदात असताना या आनंदात विरजण पडले ज्या मुलाचे लग्न होते त्या नवरदेवाची लग्नाच्या एक दिवसा आधीच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना 7 मार्च रोजी मध्यरात्री देवली एक्स्टेन्शनच्या राजू पार्कमध्ये घडली आहे. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. गौरव सिंघल असे या मयत तरुणाचे नाव आहे.
सदर घटना 7 मार्च च्या मध्यरात्री घडली आहे. 29 वर्षीय गौरव सिंघल नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचं समोर आलं. कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेलं पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.मयत गौरव हा जिम चालवायचा. त्याच्या वडिलांनीच त्याची हत्या करून वडील घरातून फरार झाला. जाताना 50 लाखांचे सोने, 15 लाख रुपये घेऊन गेले.त्यांना जयपूर येथून अटक करण्यात आली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आल्यावर पंचनामा केला पोलिसांना संशय आहे की तरुणाच्या वडिलांनी इतर काही लोकांसह मिळून गौरवची . हत्या केली आहे. गौरवाची हत्या का करण्यात आली अद्याप हे कळू शकले नाही. गौरव हा कुटुंबियांच्या दबावात येऊन हे लग्न करत होता या मुळे त्याचे वडिलांशी भांडण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मयत गौरवच्या वडिलांना जयपूर येथून अटक केली असून प्रकरणाचा तपास करत आहे. .