सध्या निवडणूक आयुक्त असलेले ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी माजी अर्थसचिव अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती पदमुक्त होत आहेत. त्यांच्या जागी ओम प्रकाश रावत पदभार स्वीकारतील.