भारत बनला ऑस्ट्रेलिया ग्रूपचा सदस्य

शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:09 IST)

भारत आता ऑस्ट्रेलिया ग्रूपचा सदस्य बनला आहे. ऑस्ट्रेलिया ग्रुप एक अनौपचारिक संस्था आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा समावेश आहे. अमेरिका आणि फ्रान्स यांनी या समूहात भारताला सदस्य करावं यासाठी प्रयत्न करत होता. भारताकडून निर्यात केल्या जाणा-या लष्करी उपयोगासाठी वापरल्या जाणा-या वस्तूंमध्ये सर्वाधिक रसायने आहेत. परंतू त्याची देखरेख करण्यासाठी देखील येथे एक उत्तम व्यवस्था आहे. आता या गटात प्रवेश मिळविल्यानंतर, भारताला रासायनिक व जैविक घटकांच्या जागतिक व्यापारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. भारताचे फ्रान्समधील राजदूत अलेक्झेंडर जेगलर यांनी भारतीय कूटनीतीच्या यशाचे शुक्रवारी अभिनंदन केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती