ओखी शमले, मात्र आजही पाऊस कायम

बुधवार, 6 डिसेंबर 2017 (10:06 IST)

गुजरातच्या दिशेने सरकणारे ओखी चक्रीवादळ गुजरातला पोहोचण्यापूर्वीच शमले आहे. त्यामुळे गुजरातला दिलासा मिळाला आहे. मात्र  बुधवारी देखील मुंबई व कोकण किनारपट्टी तसेच गुजरातमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गुजरातमधील सुरतजवळ हे वादळ स्थिरावणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र स्कायमेटने हे वादळ सुरतला पोहोचण्यापूर्वीच शमल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट केले. या वादळाचा आता गुजरातला कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले. मात्र, ओखी वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातमध्ये पुढील दोन दिवस पाऊस हजेरी लावणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

या वादळात ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार अद्याप बेपत्ताच आहेत. ओखी वादळाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आहेत. तर द्राक्ष व कांद्याचे पीकही धोक्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती