राष्ट्रभाषेतून आता करता येणार पासपोर्टसाठी अर्ज

पासपोर्ट काढण्याची प्रक्रियासोपी होणार आहे. तर अनेकांना होत असलेली भाषेची अडचण काही अर्थी दूर होणार आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या तरतुदीनुसार पासपोर्टसाठी राष्ट्रभाषा अर्थात हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे.  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अधिकृत भाषा संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशीस्वीकारल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.  हा अहवाल सरकारला समितीने 2011 साली दिला होता.
 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या शिफारशींना मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हिंदीतील अर्ज डाऊनलोड करुन अर्ज पासपोर्ट कार्यालयात जमा करता येईल. त्यामुळे अनेक भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा भाषेची अडचण होत असल्याने अनेक चुका होत असत मात्र आता त्या टाळता येणे शक्य आहे. तर देशातील अन्य भाषात सुद्धा हे अर्ज प्राप्त होतील अशी शक्यात आहे.

वेबदुनिया वर वाचा