नोएडा : भटक्या कुत्र्याचा बाळावर हल्ला
नोएडा येथील सहाय्यक पोलिस आयुक्त (नोएडा वन) रजनीश वर्मा यांनी सांगितले की निवासी सोसायटीत सोमवारी एका कुत्र्याने हल्ला करून सात महिन्यांच्या बाळाला जखमी केले. त्याला गंभीर जखमा झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेक्टर 100 मधील लोटस बुलेवर्ड सोसायटीच्या आवारात दुपारी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्मा म्हणाले, “मुलाचे पालक मजूर आहेत. दोघेही सोसायटीत बांधकामाचे काम करत होते आणि मुल त्यांच्या शेजारी झोपला होता, मात्र एक भटका कुत्रा सोसायटीत घुसला. कुत्र्याने मुलाला चावा घेतला आणि त्याला गंभीर जखमी केले."