कोरोना मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई नाही : केंद्र सरकार

रविवार, 15 मार्च 2020 (13:21 IST)
कोरोना विषाणूमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबीयाला ४ लाखांची मदत करण्याची घोषणा काल केंद्र सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र एकाच दिवसात केंद्र सरकारने यु-टर्न घेतला असून हा निधी कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
 
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत करण्यात येणार होती. मात्र दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारने यु-टर्न घेतला. मृतांच्या नातेवाईकांना निधी देण्यापेक्षा कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती