सपासोबत युती नाही, अखिलेश यादवांनी अपमान केला - चंद्रशेखर

रविवार, 16 जानेवारी 2022 (10:57 IST)
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानं उत्तर प्रदेशात पक्षांतरं आणि युत्या-आघाड्यांना सध्या जोर आला आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत अनेक लहान-सहान पक्ष जोडले जात असतानाच, आझाद समाज पार्टीनं पाठ वळवलीय.
यूपीतल्या येत्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करणार नसल्याचं आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी जाहीर केलं. अखिलेश यादव यांनी अपमान केल्याचा दावाही त्यांनी केला.
"आम्ही एका महिन्यापेक्षा जास्त दिवस यावर चर्चा करत होतो आणि मागच्या सहा महिन्यांपासून भेटी झाल्या. पण युतीसंदर्भात काहीही साध्य झालं नाही. म्हणून आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढू," असं चंद्रशेखर म्हणाले.
 
दुसरीकडे, उत्तर प्रदेशात भाजपला हरवणं येऱ्या-गबाळ्याचं काम नाही, असं केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी म्हटलंय. 
"उत्तर प्रदेशात भाजप सोडून गेले त्यांचंच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार आहे," असा दावाही रामदास आठवलेंनी केलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती