एनएमएसीसी ने विक्रम केला, एका वर्षात 10 लाखांहून अधिक प्रेक्षक 700 शो पाहण्यासाठी आले

सोमवार, 1 एप्रिल 2024 (10:41 IST)
• पहिल्या वर्धापनदिनानिमित्त चार दिवसांचे उत्सव सुरू 
• अमित त्रिवेदी यांनी ‘भारत की लोक यात्रा’ हे पहिले सादरीकरण दिले.
 
 नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर किंवा NMACC आपला पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे. आपल्या पहिल्याच वर्षात एनएमएसीसी ने कलाविश्वातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या 366 दिवसांमध्ये, 670 कलाकारांनी एनएमएसीसी(NMACC) मध्ये 700 हून अधिक शो सादर केले. प्रेक्षकांनीही या शोवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. हे शो पाहण्यासाठी 10 लाखांहून अधिक प्रेक्षक एनएमएसीसी वर पोहोचले. या शोमध्ये 'सिव्हिलायझेशन टू नेशन' सारख्या भारतीय थिएटरपासून ते 'द साऊंड ऑफ म्युझिक' सारख्या आयकॉनिक ब्रॉडवे म्युझिकपर्यंत सर्व काही दाखवण्यात आले.
 
पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, एनएमएसीसी(NMACC) येथे सलग चार दिवस विशेष शो होणार आहेत. पहिल्या दिवशी अमित त्रिवेदी यांनी ‘भारत की लोकयात्रा’ हे अप्रतिम सादरीकरण केले. भारतभरातील गायक आणि संगीतकार त्यांच्यासोबत रंगमंचावर सामील झाले होते.
 
वर्धापनदिनानिमित्त बोलताना, एनएमएसीसी(NMACC) चेअरपर्सन नीता अंबानी म्हणाल्या, “गेल्या वर्षभरात, एनएमएसीसी(NMACC) ने विविध कला परंपरांमधील मास्टर्सचे आयोजन केले आहे. तरुण उदयोन्मुख कलाकारांना पाठिंबा दिला आहे. भारतातील आणि जगभरातील उत्कृष्ट शास्त्रीय आणि लोकसंगीत असलेले, संस्मरणीय नाटके आणि नृत्य सादरीकरणे आयोजित केली गेली आहेत. "कला, कलाकार आणि प्रेक्षकांसाठी एनएमएसीसी (NMACC) एक अविश्वसनीय गंतव्यस्थान म्हणून उदयास आले आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे."
 
त्या पुढे म्हणाल्या  – “मुकेश आणि माझे आमचे मिळून एक स्वप्न होते की आपण एक केंद्र तयार करू जे कला, संस्कृती आणि ज्ञान या त्रिमूर्तीचा संगम असेल. जिथे संगीताला नवीन स्वर मिळतात, नृत्याला नवी लय मिळते, कलेला नवे घर मिळते आणि कलाकारांना नवे आकाश मिळावे. आज मी मोठ्या नम्रतेने आणि आत्मविश्वासाने सांगू शकते की ते स्वप्न आता खरे झाले आहे.”
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती