भाजपच्या पाठिंब्याने नीतिश कुमार यांनी पुन्हा शपथ घेतली

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा देऊन राजकीय भूकंप घडविला असून गुरुवारी सकाळी दहा वाजता भाजपाच्या सहकार्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल यांनी नितीशकुमार आणि सुशील मोदी यांना शपथ दिलवली. सुशील कुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याप्रकारे नीतिश कुमार सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले.
 
नीतिश कुमार यांनी घाईत घेतलेल्या या निणर्याचा बिहारमध्ये चुकीचा संदेश पसरेल असे शरद यादव यांनी म्हटले आहे. तसेच नितीश यांनी मला धोका दिला असे लालू यादव यांचे म्हणणे पडले.
 
उल्लेखनीय आहे की जेडीयू नेते नितीश कुमार यांनी बुधवारी तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश यांनी बुधवारी संध्याकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपली राजीनाम सुपुर्द केला. गेल्या काही दिवसांमध्ये राजद नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. मात्र, तेजस्वी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू यांनी घेतली होती. यानंतर नितीश यांनी पद सोडून सर्वांनाच धक्का दिला.

वेबदुनिया वर वाचा