तसेच रस्ते बांधकाम उद्योगाला नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत पुनर्वापरयोग्य बांधकाम साहित्याचा अवलंब करून रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी धोरणे विकसित करण्याचे आवाहनही मंत्र्यांनी केले. केंद्रीय मंत्री म्हणाले, “भारतात साइनबोर्ड आणि रोड मार्किंग सिस्टीमसारख्या छोट्या गोष्टी देखील खूपच खराब आहे. आपल्याला स्पेन, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांकडून शिकण्याची गरज आहे.