मॅसॅच्युसेट्सच्या राज्यपालांनी केला नीता अंबानींचा सन्मान

रविवार, 16 फेब्रुवारी 2025 (14:39 IST)
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांचा अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्याच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी सन्मान केला आहे. नीता अंबानी यांना देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रात त्यांना एक दूरदर्शी आणि परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले आहे. बोस्टनमध्ये एका विशेष समारंभात नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आले.
 
राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे की, "हा पुरस्कार नीता अंबानी यांच्या शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा, कला, संस्कृती आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील समर्पण आणि प्रभावी कार्याची दखल घेण्यासाठी आहे - ज्याने भारतातील आणि जागतिक स्तरावर लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम केला आहे."
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कला, परंपरा आणि संस्कृती प्रदर्शित करण्याची एकही संधी नीता अंबानी सोडत नाहीत. बोस्टनमधील समारंभातही नीता अंबानी यांनी भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे प्रतीक असलेली हाताने विणलेली शिकारगाह बनारसी साडी परिधान केली. गुंतागुंतीच्या विणकाम तंत्र आणि पारंपारिक कोन्या डिझाइनसह, ही साडी भारतीय कारागिरीचे एक उदाहरण आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती