मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, रामपूर मणिहरण पोलीस स्टेशन परिसरातील इस्लामनगर गावातील नऊ वर्षाचा मुलगा हा शेतात खेळण्यासाठी गेला असताना त्याच्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. "कुत्र्यांनी मुलाला खूप चावले आणि त्याच्या शरीरावर ओरखडे काढले," कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे अनेक भाग गंभीरपणे विकृत केले." मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले. व मुलाला त्याला ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.