चीन मध्ये मानवांमध्ये नवा व्हायरस बर्डफ्लू आढळला

मंगळवार, 1 जून 2021 (19:46 IST)
बीजिंग. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चीनमधून भीतीदायक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये पहिल्यांदा मानवांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) 41 वर्षांच्या एका व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूच्या एच 10 एन 3 ताणला दुजोरा दिला आहे.हा व्यक्ती चीनच्या जिआंग्सु प्रांतातील राहणारा आहे.
NHC म्हटले आहे की ताप आणि इतर लक्षणांमुळे या व्यक्तीस 28 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका महिन्यानंतर, म्हणजेच, 28 मे रोजी, H10N3 स्ट्रेन त्यात सापडला.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) पीडित व्यक्तीबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे, परंतु असे म्हटले जाते की हा संसर्ग कोंबड्यांपासून मनुष्यांपर्यंत आला.
तथापि, NHCचे म्हणणे आहे की H10N3 ताण फारच शक्तिशाली नाही आणि त्याचा व्यापक प्रसार होण्याचा धोका देखील कमी आहे. पीडितेची प्रकृती आता स्थिर आहे आणि लवकरच त्याला रुग्णालयातून सोडण्यात येईल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती