मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती 2017 मध्ये शहीद झाला.पतीच्या मृत्यू नंतर पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या बहाण्याने तिचा पुतणा घरी येऊ लागला आणि नंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्या कडून पैसे घेऊ लागला त्याने तिच्या कडून 39 लाख रुपये घेतले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करू लागला. तिने त्याच्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्न केला असता त्याने स्वतःच्या हातावर गोळी झाडली.