NDA विरुद्ध INDIA : कोणत्या आघाडीत कोणते पक्ष? लोकसभेत कोणाचे किती सदस्य? वाचा संपूर्ण यादी

बुधवार, 19 जुलै 2023 (14:37 IST)
लोकसभा निवडणूक 2024 ला आता एका वर्षापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. या निवडणुकीसाठीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केल्याचं दिसून येत आहे.ही निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येईल, हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू करण्यात आले आहेत.
 
याच अंतर्गत काल (मंगळवार, 18 जुलै) सायंकाळी दिल्ली येथे NDA च्या 38 सहकारी पक्षांची बैठक पार पडली. तत्पूर्वी, या बैठकीच्या काही तास आधीच बंगळुरू येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीचीही एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
Indian National Developmental Inclusive Alliance अर्थात I.N.D.I.A. असं विरोधी पक्षांच्या आघाडीचं नामकरण करण्यात आलं आहे.
 
आजवर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या शब्दाचं लघू रूप-दीर्घ रूप यांच्या माध्यमातून योजनांचं अर्थपूर्ण नामकरण करण्याची शैली पुढे आली होती.
 
विरोधी पक्षांनीही या वेळी हीच खेळी खेळत I.N.D.I.A. याच नावाने आपली आघाडी बनवलेली आहे. याचं प्रत्युत्तर म्हणून भाजप आता इंडिया विरुद्ध भारत अशा अर्थाने त्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न करेल, हे पक्षातील काही नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे.
 
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील सामना भाजपप्रणित NDA विरुद्ध विरोधी पक्षांची I.N.D.I.A. आघाडी असा रंगणार हे स्पष्ट आहे.
 
सध्या तरी NDA मध्ये 38 तर I.N.D.I.A. मध्ये 26 पक्ष सहभागी झाले आहेत. पण अजूनही काही पक्षांनी अद्याप त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत.
 
ते ऐनवेळी वरीलपैकी कोणत्या आघाडीत सामील होतात किंवा स्वबळावर निवडणुकीस सामोरे जातात की तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पुन्हा केला जाईल, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
 
दोन्ही आघाड्यांच्या ताकदीचा विचार केल्यास त्यामध्ये जमेच्या आणि कमकुवत अशा दोन्ही बाजू असल्याचं दिसून येतं.
 
NDA मध्ये वरकरणी पाहता 38 पक्ष दिसत असले तरी 301 लोकसभा सदस्य असलेल्या भाजपनंतर यामध्ये थेट 13 सदस्यीय शिवसेनेचा (शिंदे गट) क्रमांक लागतो. याव्यतिरिक्त इतर कोणतेही मोठ्या पक्षांचं नाव अद्याप या आघाडीत सहभागी झालेले नाहीत.
 
तर I.N.D.I.A. मध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पक्ष आणि जनता दल (संयुक्त) अशा अनेक मजबूत पक्षांची उपस्थिती दिसून येत असली तरी त्यामध्ये नेतृत्व कुणाकडे असणार हे अद्याप स्पष्ट नाही. शिवाय, एकमेकांना विविध ठिकाणी विरोध करणारे किंवा काही मुद्यांवर असहमत असलेले पक्षही यामध्ये दिसून येतात. त्यामुळे या आघाडीचं काम नेमकं कसं चालेल, याविषयी प्रश्न आहेत.
 
शिवाय, या दोन्ही ठिकाणी उपस्थिती नसलेल्या इतर पक्षांचीही संख्या मोठी आहे.
 
या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे जाणून घेऊ, NDA, I.N.D.I.A. तसंच अद्याप भूमिका जाहीर न केलेल्या पक्षांची संपूर्ण यादी, त्यांचं राज्य आणि लोकसभेतील या पक्षांचं सध्याचं संख्याबळ -
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) सदस्य पक्ष
भारतीय जनता पक्ष – राष्ट्रीय पक्ष - 301
शिवसेना – महाराष्ट्र - 13
राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (पशुपती कुमार पारस) – बिहार - 05
अपना दल (सोनिलाल) - उत्तर प्रदेश - 02
नॅशनल पीपल्स पार्टी – राष्ट्रीय पक्ष - 01
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) - महाराष्ट्र - 01
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) - बिहार - 01
नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टी – नागालँड - 01
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन – झारखंड - 01
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा – सिक्कीम - 01
मिझो नॅशनल फ्रंट – मिझोराम - 01
नागा पीपल्स फ्रंट - नागालँड - 01
इंडिजिनिअस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा - त्रिपुरा - 00
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) - महाराष्ट्र - 00
आसाम गण परिषद - आसाम - 00
पत्तल्ली मक्कल कत्छी - तामिळनाडू - 00
तमीळ मनिला काँग्रेस - तामिळनाडू - 00
युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल - आसाम - 00
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी - उत्तर प्रदेश - 00
शिरोमणी अकाली दल (संयुक्त) - पंजाब - 00
महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी - गोवा - 00
जननायक जनता पार्टी - हरयाणा - 00
प्रहार जनशक्ती पार्टी - महाराष्ट्र - 00
राष्ट्रीय समाज पक्ष - महाराष्ट्र - 00
जनसुराज्य शक्ती पार्टी - महाराष्ट्र - 00
कुकी पीपल्स अलायन्स - मणिपूर - 00
युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी - मेघालय - 00
हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी - मेघालय - 00
निशाद पार्टी - उत्तर प्रदेश - 00
ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस - पुदुच्चेरी - 00
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) - बिहार - 00
जन सेना पार्टी - आंध्र प्रदेश - 00
हरयाणा लोकहित पार्टी - 00
भारत धर्म जन सेना - केरळ - 00
केरळ कामराज काँग्रेस - केरळ - 00
पुतिया तमिलगम - तामिळनाडू - 00
गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट - पश्चिम बंगाल - 00
ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) – तामिळनाडू - 00
Indian National Developmental Inclusive Alliance मधील (I.N.D.I.A.) सदस्य पक्ष
काँग्रेस – राष्ट्रीय पक्ष - 49
द्रविड मुनेत्र कळघम – तामिळनाडू 24
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस – पश्चिम बंगाल - 23
जनता दल (संयुक्त) - बिहार - 16
शिवसेना (उबाठा) – महाराष्ट्र - 06
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष {CPI(M)} - राष्ट्रीय पक्ष - 03
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) – महाराष्ट्र - 03
समाजवादी पक्ष – उत्तर प्रदेश - 03
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स – जम्मू काश्मीर - 03
इंडियन युनियन मुस्लीम लीग – केरळ - 03
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)- केरळ - 02
विदुतलाई चिरुतैगल कत्छी (VCK) - तामिळनाडू - 02
आम आदमी पक्ष – राष्ट्रीय पक्ष - 01
झारखंड मुक्ती मोर्चा – झारखंड - 01
केरळ काँग्रेस (M) - केरळ - 01
मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) - तामिळनाडू - 01
रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) – पश्चिम बंगाल - 01
कोंगुनाडू मक्कल देसिया कत्छी (KMDK) – तामिळनाडू - 01
राष्ट्रीय जनता दल - बिहार - 00
राष्ट्रीय लोक दल – उत्तर प्रदेश - 00
अपना दल (कमेरावादी) – उत्तर प्रदेश - 00
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) – केरळ - 00
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स-लेनिनिस्ट लिबरेशन {CPI(ML)} - बिहार - 00
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक – पश्चिम बंगाल - 00
मणितनेया मक्कल कत्छी (MMK) - तामिळनाडू - 00
केरळ काँग्रेस (जोसेफ) - केरळ - 00
अद्याप भूमिका जाहीर न केलेले प्रमुख पक्ष
वायएसआर कांग्रेस पक्ष - आंध्र प्रदेश - 22
बिजू जनता दल - ओडिशा - 12
भारत राष्ट्र समिती - तेलंगण - 09
बहुजन समाज पार्टी - राष्ट्रीय पक्ष - 09
तेलुगू देसम पार्टी - आंध्र प्रदेश - 03
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलीमिन (AIMIM) - तेलंगण - 02
जनता दल (सेक्युलर) - कर्नाटक - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - महाराष्ट्र - 00
 


Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती