राष्ट्रवादीची भाजपसोबत युती… नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा नविन प्रयोग

गुरूवार, 9 मार्च 2023 (08:19 IST)
नागालँड विधानसभेत NDPP आणि भाजपा युतीला स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालीत ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने सत्तेत वाटा मिळवला आहे. NDPP आणि भाजप यांच्या विरोधात न जाता त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयाने राजकिय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
NDPP आणि भाजपा युतीला नागालँड विधानसभेच्या निवढणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. NDPP- भाजपा राज्यातील अनेक छोट्यामोठ्या पक्षांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे हे सरकार मजबूत स्थितीमध्ये होता. तरीही प्रमुख विऱोधी पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसने NDPP- भाजपा युतीला पाठींबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या भुमिकेमुळे नागालँड विधानसभेत आता विरोधी पक्षाचे अस्तित्व राहीले नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने २ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला.
 
नागालँडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांची भेट घेऊन स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा केली. या बैठकीनंतर नागालँडमध्ये NDPP- भाजपा युतीच्या सरकारला पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तंब झाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती