रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा

गुरूवार, 19 मे 2022 (14:27 IST)
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
 
रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
 
काय आहे प्रकरण ?
पटियाला येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांच्यात पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती