मिळालेल्या माहितनुसार यापूर्वी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल फोनवरून अभिनंदन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार आणि संरक्षण यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करतील.
मिळालेल्या माहितीनुसार मोदी पॅरिसचा दोन दिवसांचा दौरा संपवल्यानंतर वॉशिंग्टन डीसीला जातील. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अमेरिकेची राजधानी येथे पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या काळात ट्रम्प स्वतः पंतप्रधान मोदींसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन करू शकतात.