'द मॉर्निंग कन्सल्ट' नावाच्या एका अमेरिकन संस्थेनं हे सर्वेक्षण केलं आहे. यात ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंगमध्ये मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडामधील नेत्यांनाही मोदींनी यात पछाडलं आहे.
या सर्वेक्षणात 70 टक्के रेटिंगसह मोदी अव्वल स्थानी आहेत. तर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर असून त्यांना 64 टक्के रेटिंग मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पाचव्या स्थानी असून त्यांना 48 टक्के रेटिंग मिळालं आहे.