JNUहून बेपत्ता विद्यार्थ्यांच्या आईला मिळाले पत्र, लिहिले होते - मी नजीबला अलीगढ़च्या मार्केटमध्ये बघितले

शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (14:51 IST)
दिल्ली पोलिस आणि क्राईम ब्रांचच्या टीमला एक रहस्यमय पत्र मिळाले. पत्रात जवाहर लाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU)हून गहाळ विद्यार्थी नजीब अहमदला अलीगढ़मध्ये दिसण्याचा दावा केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 14 नोव्हेंबरला JNU च्या माही-मांडली हॉस्टलमध्ये एक लेटर आले. ते लेटर हॉस्टलचे अध्यक्ष अजीमला मिळाले. अजीमने ते पत्र नजीबची आई फातिमा नफीसला दिले. फातिमा त्या पत्राला घेऊन क्राईम ब्रांचमध्ये पोहोचली होती. लेटर एका महिलेने लिहिले होते. त्यात लिहिले होते की तिने नजीबला अलीगढ़च्या मार्केटमध्ये फिरताना बघितले आहे. महिलाने पुढे लिहिले आहे की तिची नजीबशी बोलणेही झाले होते. महिलाने लिहिले की नजीब ने तिला सांगितले की त्याला बंदी बनवून ठेवले होते पण तो कसाबसा पळून बाहेर आला आहे. पण जेव्हा तिने त्याची मदत करण्याचा प्रयत्न केला  तेव्हा तो तेथून निघाला आणि नंतर दिसला नाही. महिलाने लिहिले आहे की तो कुठेतरी लपून बसला असेल किंवा त्याला कोणी उचलून नेले असतील. महिलाने आपला पत्ता दिला होता. पण जेव्हा क्राईम ब्रांचची टीम तिने दिलेल्या अॅड्रेसवर पोहोचली तर तेथे त्याला कोणीच  भेटले नाही.  
 
पत्रात खंडणीच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला नव्हता. आता क्राईम ब्रांचने कोरियर एजेंसीला त्या जागेचा शोध लावण्यास सांगितला आहे जेथून पत्र डिसपैच करण्यात आले होते आणि पत्राला फोरेंसिक तपासणीसाठी पाठवण्यात येऊ शकते. जेथे तिच्या हेंडराइटिंगची तपासणी करण्यात येईल.  
 
महत्त्वाचे म्हणजे स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा छात्र नजीब अहमद शनिवार (15 ऑक्टोबर) पासून गायब आहे. त्याचे गायब होण्या अगोदर कँपसमध्ये त्याचा विवाद झाला होता. जेएनयूच्या एका विद्यार्थ्याने दावा केला होता की जेव्हा विश्वविद्यालयाचे छात्र नजीब अहमदची एबीवीपी समर्थकांशी झडप झाली होती, त्या वेळेस त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. पण एबीवीपीने या आरोपांना खारिज केले होते. नजीबची माहिती देणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी 5 लाख रुपये देण्याचा फर्मान काढला आहे.

वेबदुनिया वर वाचा