माझी गाय दूध देत नाही, तुम्ही तिला पोलीस ठाण्यात बोलावून सजवून सांगा ,शेतकऱ्याची गायीच्या विरोधात तक्रार

बुधवार, 8 डिसेंबर 2021 (16:58 IST)
चोरी, दरोडा धमकावणे, मारहाण, खून आणि बलात्काराच्या घटना पोलीस ठाण्यात येतात. लोक त्या त्या प्रकरणा संदर्भात तक्रार नोंदवतात. काही वेळा असे ही प्रकरणे पोलिसांकडे येतात ज्यांना एकूण पोलीस अस्वस्थ होतात. असेच काही घडले आहे कर्नाटकच्या पोलीस ठाण्यात.नुकतेच कर्नाटक पोलिसांच्या निर्देशनास असे प्रकरण समोर आले आहे ज्या मध्ये एका व्यक्तीने आपल्या गायी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. त्याने आपल्या गायीच्या विरोधात तक्रार केली आहे की माझी गाय गेल्या 4 -5 दिवसांपासून दूध देत नाही, त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करावा.  
 
नेमकं काय आहे प्रकरण -
माहितीनुसार, हे प्रकरण कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सिदलीपुरा गावातील आहे. या गावात राहणाऱ्या रामय्या नावाच्या शेतकऱ्याने तक्रार घेऊन होलेहुन्नूर पोलीस ठाणे गाठले. त्याने आपली तक्रार पोलिसांना ऐकवल्यावर पोलीस थक्क झाले.आणि त्यांचे मन गहिवरून आले.  त्याने माझी गाय गेल्या 4 -5 दिवसांपासून दूध देत माही. मी तिला चांगले चरायला देखील देतो. तुम्ही तिला ठाण्यात बोलवून तिला समजवा आणि तिला दूध देण्यास प्रवृत्त करावे. असे त्यानी पोलिसांना विनवणी केली. 

पोलिसांनी काय केले- 
पोलिसांनी शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेतली .नंतर पोलिसांनी त्याला समजावून सांगितले की पोलीस ठाण्यात अशा प्रकारची प्रकरणे सोडवली जात नाही. किंवा नोंदवून देखील घेतली जात नाही. तू हा प्रश्न स्वताच सोडाव असे पोलिसांनी त्याला समजावून परत पाठवले.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती