मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 7 वाजता जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात ही घटना घडली. मृत जसवंतजी ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. जसवंतचे थोरले भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसांना सांगितले की, दोघेही त्यांच्या घराजवळील मेलडी माता मंदिरात आरती करत होते. यावेळी लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती. तेवढ्यात सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवनजी ठाकोर, विनुजी ठाकोर आले आणि म्हणाले की तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर का वाजवत आहात? आम्ही आरती करतो, असे अजितने सांगितले, त्यानंतर सदाजीने शिवीगाळ सुरू केली.यावर आक्षेप घेत सदाजीने सहकाऱ्यांना बोलावून घेतले. सर्वांनी आमच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.