मुंबईत उभारणार बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत

सोमवार, 17 एप्रिल 2017 (12:04 IST)
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही मोठी आणि आलिशान इमारत बांधण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत योजना तयार असून केवळ कॅबिनेटच्या मंजुरीची वाट पाहत आहोत असं गडकरी म्हणाले.
 
गडकरींच्या या ड्रीम प्रोजेक्टपर्यंत पोहोचण्यासाठी मरीन ड्राइव्हपेक्षाही मोठा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्याच्या दुतर्फा झाडं असणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोलताना गडकरी म्हणाले, मुंबईत आमच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. प्रसिद्ध ताज होटल, बलार्ड एस्टेट, रिलायन्स बिल्डिंग यांचे आम्ही (मुंबई पोर्ट ट्रस्ट)मालक आहोत. बंदराला लागून असलेली जमीन विकसित करणार आहोत.ही योजना अत्यंत चांगली असून या योजनेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील येण्याची वाट पाहत आहोत.

वेबदुनिया वर वाचा