अंत्यसंस्कारासाठी नेलेल्या पार्थिवात हालचाल दिसली, मृतदेह थेट रुग्णालयात नेले

सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (10:05 IST)
उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात शंभू नगर परिसरात श्मशानात आणलेले पार्थिवाचे होठ आणि गाल हलताना दिसल्यावर कुटुंबीयांनी मृत देह थेट रुग्णालयात नेण्याचा प्रकार घडला आहे. 
बांदा जिल्ह्यातील शंभू नगर येथे राहणारे75 वर्षीय वृंदावन पाल हे सेवा निवृत्त शिक्षक होते. त्यांना अनेक दिवसांपासून ताप येत होता त्यांचे प्लेट्सलेट्स कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. शनिवारी त्यांना अंत्यसंस्कारासाठी श्मशानात नेण्यात आले. त्यांचे पार्थिव चितेवर ठेवलेले असता त्यांचे ओठ त्यांच्या मुलाला हलताना दिसले. आपले वडील जिवंत आहे या आशेने चितेवरून गुंडाळलेल्या सह पार्थिव थेट रुग्णालयात नेले.

रुग्णालयात कपड्यात गुंडाळलेला मृतदेह पाहता लोकांमध्ये घबराहट झाली. डॉक्टरांनी मृतदेह तपासल्यावर त्यांनी वृंदावन यांना मृत घोषित केले.ओठ कसे काय हलले असे मुलाने डॉक्टरांना विचारल्यावर  डॉक्टर म्हणाले, माणसाच्या मृत्यू नंतर शरीराचे तापमान हळू -हळू कमी होते. या मुळे स्नायूंमध्ये हालचाल होते. आणि ते अवयवांमध्ये हालचाल  होताना दिसते. मृतदेह पुन्हा श्मशानात आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत मुलाने मुखाग्नी दिली. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती