हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर कोतवाली परिसरात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाच्या 10 दिवस आधी एक आई तिच्या प्रियकरासह पळून गेली. एवढेच नाही तर प्रियकरासह पळून जाण्यापूर्वी महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिनेही पळवून नेले. नातेवाइकांनी पोलीस ठाणे गाठले असता हा प्रकार उघडकीस आला.
महिलेच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली. महिलेला 3 मुले (एक मुलगा आणि 3 मुली) आहेत. 14 डिसेंबरला मोठ्या मुलीचे लग्न होणार असताना, घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती, पाहुण्यांचे आगमनही सुरू झाले होते. बहुतेक नातेवाईकांना लग्नाची निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. शनिवारी रात्री कुटुंबाला सोडून ही महिला अचानक संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली.