Monkey in Hospital : आरएमएल हॉस्पिटलच्या न्यूरो सर्जरी विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये माकड घुसल्याचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर प्रसारित होत आहे. ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित डॉक्टर आणि कर्मचारीही घाबरले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी काठीने माकडाला ऑपरेशन थिएटरपासून दूर हाकलले.