VIP कल्चरवर मोदींची मार, 1 मे पासून फक्त हे 5 लोकच लावू शकतात 'लाल दिवा'

बुधवार, 19 एप्रिल 2017 (15:51 IST)
केंद्राची नरेंद्र मोदी कॅबिनेटने बुधवारी व्हीव्हीआयपी कल्चरच्या विरोधात एक कडक निर्णय घेतला आहे. येणार्‍या 1 मे पासून आता फक्त 5 लोकच लाल दिवेचा वापर करू शकतील. आता फक्त - राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री लाल दिवेचा वापर करू शकतील. असे सांगण्यात येत आहे की 1 मे पर्यंत पंतप्रधान देखील लाल दिवेचा वापर करणार नाही.    
 
दरम्यान, उत्तर  प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वांत प्रथम आपल्या सर्व मंत्र्यांना व्हीआयपी संस्कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच कोणत्याही मंत्र्याने आपल्या वाहनावर लाल दिवा न लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ दोन दिवसांनंतर  पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही महत्त्वाच्या श्रेणीतील नेते तसंच अधिका-यांचा अपवाद वगळता आपल्या मंत्र्यांना लाल दिव्यांच्या गाडीचा वापर न करण्याची सूचना दिली होती.  त्यांच्या या सूचनेनंतर मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढण्यात आले. 
 
पीएम मोदी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलच्या विपरीत आयजीआय विमानतळावर स्वत: पोहोचले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत फक्त त्यांना ड्रायव्हर आणि एक एसपीजी कमांडो सोबत होता. 

वेबदुनिया वर वाचा