बिहारमध्ये आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रशांत किशोर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता प्रशांत किशोर यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आश्वासने देतात, मात्र गुजरातमध्ये कारखाने सुरू करतात, असा टोला त्यांनी लगावला. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय. बिहारमधील नरकटियागंज येथील एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी हे वक्तव्य केले आहे.
प्रशांत किशोर म्हणाले, "ते म्हणाले, मोदीजींना घराघरातून मते मिळाली, ते पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र प्रत्येक घरातील सिलेंडरची किंमतही 500 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत वाढली. 200 रुपयांचे 5 किलो धान्य देऊन मोदीजी तुमच्या खिशातून 500 ऐवजी 1300 रुपये सिलेंडरच्या नावावर काढतात. पुढच्या वेळी जिंकल्यास सिलिंडरची किंमत 2000 पेक्षा जास्त असेल."
प्रशांत किशोर यांनी गुजरातचा संदर्भ देत म्हटले की, मोदीजी बिहारमध्ये कारखाने सुरू करण्याचे आश्वासन देतात, पण नंतर ते कारखाने गुजरातमध्ये सुरू केले जातात.