तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासंबंधीचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले. विरोधकांच्या गदारोळात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ते सभागृहाच्या पटलवर ठेवले. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
कृषी कायद्यांबाबत काँग्रेसचे संसद भवन परिसरात निदर्शने
आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमलेल्या काँग्रेस सदस्यांनी मोठा बॅनर हातात घेतला होता, ज्यावर इंग्रजीत लिहिले होते- आम्ही काळे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो.ते सरकारविरोधी घोषणा देत होते.
विशेष म्हणजे सरकारने तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे हित जपल्याशिवाय पक्ष स्वस्थ बसणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, संसदेच्या पहिल्या दिवशी सकाळी दिवंगत माजी खासदारांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.