तसेच हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे बिहारी परंपरेने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत पारंपारिक भोजपुरी संगीत मैफिलीने, गीत गवईने करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी मॉरिशसला पोहोचलो आहे. विमानतळावर माझे विशेष स्वागत करणाऱ्या माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांचे मी आभारी आहे. ही भेट एका मौल्यवान मित्राला भेटण्याची आणि विविध क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची एक उत्तम संधी आहे." "आज मी राष्ट्रपती धरम गोखूल, पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना भेटेन आणि संध्याकाळी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करेन," असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
या भेटीदरम्यान, दोन्ही देश कौशल्य विकास, व्यापार आणि सीमापार आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्याच्या क्षेत्रात सहकार्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी करतील. सोमवारी मॉरिशसला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की त्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये एक "नवीन आणि उज्ज्वल" अध्याय जोडला जाईल.