मौलाना सादचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह, क्राईम ब्रान्चचा विश्वास नाही

सोमवार, 27 एप्रिल 2020 (11:33 IST)
तबलीगी जमातच्या निझामुद्दीन प्रकरणातील मुख्य आरोपी मौलान सादची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सादच्या वकिलांकडून करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात आले आहे.
 
क्राईम ब्रान्चने मौलाना सादला नोटीस देऊन एम्स रुग्णालयात करोना चाचणी करून चाचणीचा अहवाल सोपवण्याचे निर्देश दिले होते. कोणत्याही खासगी लॅबच्या अहवालावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. मौलाना सादने एम्समध्ये किंवा आरएमएल किंवा सफदरजंग रुग्णालयात जाऊन चाचणी करवून रिपोर्ट सोपवावा, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असंही क्राईम ब्रान्चने स्पष्ट केलंय.
 
क्राईम ब्रान्चकडून आत्तापर्यंत निझामुद्दीन प्रकरणाशी निगडीत 200 हून अधिक जणांनी चौकशी करण्यात आलीय. या  प्रकरणात प्रमुख मौलाना सादनं स्वत:च क्वारंटाईन असल्याचं सांगितलं होतं. आता हा कालावधी संपल्यानंतर मौलान सादकडून क्राईम ब्रान्चला अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असं क्राईम ब्रान्चने सांगितलं. मौलाना सादकडून चौकशीत सहकार्याची अपेक्षा आहे. असंही क्राईम ब्रान्चने स्पष्ट केलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती