मिळालेल्या माहितीनुसार PVR जवळील बन्सी स्वीट्ससमोर सकाळी 11.48 वाजता स्फोट झाल्याचा फोन पोलिसांना आला होता. यासंदर्भात माहिती देताना दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, प्रशांत विहार परिसरात सकाळी 11.48 वाजता स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवल्या. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्फोटामुळे शेजारी उभ्या असलेल्या तीन दुचाकीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला प्रशांत विहार परिसरात सकाळी 11.48 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली.