छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले वर्ध्याचे जवान प्रेमदास मेंढे अनंतात विलीन

सोमवार, 13 मार्च 2017 (09:40 IST)
छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले वर्ध्याचे जवान प्रेमदास मेंढे अनंतात विलीन
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 11 जवान शहीद झाले आहेत. भेज्जी परिसरात सकाळी सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सोनोरा (ढोक) येथील प्रेमदास मेंढे हा जवान शहीद झाला. त्यांच्या पार्थिवावर नाचणगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
नक्षली हल्ल्यात शहीद झालेले सर्व जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते. ही घटना सकाळी 9 च्या सुमारास घडली. अत्यंत गरीब परिस्थितीतून प्रेमदास मेंढे यांनी आपले जीवन घालवले होते. त्यांचे वडील नाचणगाव येथे आजही मोलमजुरीचे काम करतात. प्रेमदास मेंढे हे तीन भावांपैकी सर्वात धाकटे होते. मनमिळावू आणि हसतमुख स्वभावाचे प्रेमदास हे सुमारे 15 वर्षापासून केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांची छत्तीसगढ येथे बदली झाली होती.
 
मागच्या प्रेमदास कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी आले होते. 19 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा देशसेवेच्या कार्यात रुजू झाले. आज झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी ते शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, मुलगा, मुलगी दोन भाऊ आहेत.
 
आणले पार्थिव
प्रेमदास मेंढे यांचे पार्थिव रायपूर येथून विमानाने वर्ध्याला आणले. वर्ध्याहून ते गाडीने नाचणगाव येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. नाचाणगाव येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा