मणिपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, 1000 हून अधिक लोकांच्या जमावाने काल रात्री इंफाळमधील केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला आणि घर पेटवून दिले. घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह इंफाळ येथील त्यांच्या घरी नव्हते. हिंसाचारात कोणाचेही नुकसान झालेले नाही.
केंद्रीय मंत्री आरके रंजन यांच्या घराला हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. मंत्री एएनआयला म्हणाले, 'मी सध्या केरळमध्ये अधिकृत कामावर आहे. सुदैवाने काल रात्री इंफाळमधील माझ्या घरावर झालेल्या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोर पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते. माझ्या घराचा तळमजला आणि पहिला मजला खराब झाला आहे.