माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, विप्लव देव यांचा राजीनामा
शनिवार, 14 मे 2022 (22:38 IST)
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी माणिक साहा यांची निवड
विप्लव कुमार देव यांच्या राजीनाम्यानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा माणिक साहा यांच्याकडे आली आहे. त्रिपुरा भाजपच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
या बैठकीला भाजपच्या केंद्रीय समितीकडून भूपेंद्र यादव हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसंच, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेही उपस्थित होते.
मावळते मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनीच ट्विटरवरून माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली.
पुढच्या वर्षी त्रिपुरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मुख्यमंत्री बदलाला महत्त्व प्राप्त झालंय.