मल्याळम अभिनेता दिलीपची कडक अटींवर जामीन मंजूर

बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (12:13 IST)
अपहरण आणि बलात्काराच्या आरोपांवरून गेले 85 दिवस अटकेत असलेल्या मल्याळम अभिनेता दिलीपला अखेर जामीन देण्यात आला आहे. मात्र उच्च न्यायलयाने दिलीपला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती सुनील थॉमस यांनी कडक अटी घातल्या आहेत.
 
दिलीपने पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता कामा नये. त्याने आपला पासपोर्ट जमा केला पाहिजे. एक लाख रुपयांचा बॉंड आणि दिवाळखोर नसलेले दोन जामीन दिले पाहिजेत. कधीही बोलवल्यानंतर त्याने तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले पाहिजे. दिलीपने कोणत्याही प्रकारे पीडितेवर वा साक्षीदारांवर दबाव आणता कामा नये व त्यांना दमदाटी करता कामा नये.
 
यापूर्वी चार वेळा दिलीपला जामीन नाकारण्यात आला होता. आता तपास अंतिम टप्प्यात आलेला असल्याने त्याला कस्टडी देणे आवश्‍यक नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
 
अभिनेता दिलीप 10 जुलैपासून अलुवा सब जेलमध्ये कैदेत आहे. या काळात फक्त 6 सप्टेंबर रोजी आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त काही धार्मिक क्रिया करण्यासाठी त्याला काही तास बाहेर सोडण्यात आले होते.
तामिल आणि तेलुगू चित्रपटांत कामे केलेल्या अभिनेत्रीचे 17 फेब्रुवारी रोजी अपहरण करून चालत्या गाडीमध्ये दोन तास तिचा विनयभंग केल्याचा आणि त्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप दिलीपवर ठेवण्यात आलेला आहे,

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती