नीती आयोगाचे महानिदेशक-डीएमईओ आणि सल्लागार अनिल श्रीवास्तव यांनी दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना मेक इन इंडिया मुळे 2020 पर्यंत 10 कोटी रोजगार पैदा होणार. श्रीवास्तव यांनी दावा केला की भारत चौथ्या तांत्रिक क्रांती चरणातून निघत असून यात तांत्रिकीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. मेक इन इंडियाद्वारे आम्ही 2020 पर्यंत 10 कोटी नवीन रोजगार पैदा करण्याच्या लक्ष्यासह पुढे वाढत आहोत.