पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात, कंचनगंगा एक्सप्रेसला धडकली मालगाडी

सोमवार, 17 जून 2024 (11:10 IST)
कोलकत्ता जाणारी कांचनगंगा एक्सप्रेसला  बंगालच्या सिलिगुडी मध्ये मालगाडीने मागून धडक दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्या म्हणाल्याकी, दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसीदेव परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. हे माहित पडताच मी स्तब्ध आहे. 
 
सांगितले जाते आहे की, कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून धाडक दिली आहे. रंगपानी रेल्वे स्टेशनवर हा अपघात झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की, मागील बोगी पूर्णपणे पलटली. तर मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक जखमी झाल्याची सूचना मिळाली आहे. 
 
सांगितले जाते आहे की, मालगाडीने सिग्नल तोडत एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रेल्वे मंत्री यावर पूर्ण पणे लक्ष ठेऊन आहे. ममता बॅनर्जी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तर बचाव कार्य सुरु आहे. पण अपघातामुळे अगरतला-कोलकत्ता रेल्वे लाईन पूर्णपणे प्रभावित झाली आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती