महिला जनधन खातेधारकांना मिळणार मदतीचा दुसरा टप्पा

शनिवार, 2 मे 2020 (22:46 IST)
लॉकडाऊमध्ये महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात ५०० रुपयांचा दुसरा टप्पा सोमवारपासून मिळण्यास सुरुवात होईल. कोरोनाच्या संकटात गरीबांच्या मदतीसाठी २६ मार्चपासून महिला जनधन खातेधारकांना दरमहा ५०० रुपये मदतीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती. 
 
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिला खातेधारकांना बॅंक खात्यात मे पर्यंतचा पहिला टप्पा दिला गेल्याचे अर्थ मंत्रालयाचे सचिव देवाशीष पांडा यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी हे पैसे काढण्यासाठीचे नियम जारी करण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच ते बॅंकेची शाखा किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन पैसे काढू शकतात. हे पैसे एटीएममधून देखील काढता येऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती