महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (19:09 IST)
आज पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
 
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  शौर्य पदक श्रेणीमध्ये  ६३०  व  सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८०  पोलीस पदक जाहीर झाली  आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी),  तर ६२८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि  सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ७४ पदक मिळाली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती