कोरोनाचा हा वाढता फैलाव लक्षात घेऊन, राज्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी नियमावली लागू केली आहे.
काय आहे नियमावली
– दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे त्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.
– महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी ही कोरोना चाचणी करावी लागेल.
– ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने कोरोना चाचणी करावी लागेल.