मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (9 ऑक्टोबर) मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगड, तेलंगाणा, मिझोरम या राज्यातील निवडणुकीची घोषणा केली.
छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला निवडणुका होतील.
मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला मतदान होईल.
मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणुका होतील.
राजस्थान मध्ये 23 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होईल अशी माहिती त्यांनी दिली.
या पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी एकत्रितपणे 3 डिसेंबरला होईल.
देशाच्या एकूण 1/6 भागात मतदान होणार आहे. एकूण 679 मतदारसंघात मतदान होणार आहे. तर एकूण मतदारांची संख्या 16 कोटी आहे.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 60.2 लाख आहे.
याबरोबरच निवडणूक आयोगांच्या विविध उपक्रमांची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.