Chhattisgarh : हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या डोक्यातून किडे निघाले

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (16:31 IST)
Chhattisgarh :मुले घराबाहेर राहून शिक्षण घेतात त्यांना घरपासून दूर हॉस्टेल मध्ये राहावं लागतं. हॉस्टेल मध्ये त्यांना मोठ्या  समस्येतून निघावं लागतं. जेवण व्यवस्थित मिळत नाही. तर हॉस्टेल मध्ये राहण्याच्यी व्यवस्था चांगली नसते. अशा समस्यांना तोंड देत मुले राहतात. अनेकदा हॉस्टेल मधील काही विचित्र घटना समोर येतात.

छत्तीसगड मधील एका हॉस्टेलच्या दुर्व्यवस्थेचे प्रकरण समोर आले असून या ठिकाणी अंबिकापूरमध्ये एका होस्टेलच्या विद्यार्थिनीच्या डोक्यात किडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी या विद्यार्थिनीच्या डोक्यात जखम झाली होती. तिच्यावर वेळीच उपचार झाला नाही आणि ती जखम चिघळून त्यात किडे झाल्याचे समोर आले असून होस्टेलच्या अधीक्षकांवर हॉस्टेलकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करत आहे. 

या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी सुरजपूरचे जिल्हाधिकारी गेल्यावर त्यांच्या समोर गावकर्यांनी हॉस्टेलच्या दुर्व्यस्थे बद्दल तक्रार केली. या हॉस्टेलच्या विद्यार्थींना विहिरीवर जाऊन स्नान करावं लागतं, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अभ्यासाला दिवे नाही, वीज नाही, कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागतो. जेवणात देखील कीटक निघतात . याची तक्रार हॉस्टेलच्या प्रमुखांकडे करून देखील काहीही कारवाई केली जात नाही. आता विद्यार्थिनीच्या डोक्यात किडे झाल्याचा धक्कादायक प्रकार झाला असून अधीक्षक याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली.   
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती