युपी : धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवणार

सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:20 IST)

उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर आता हटवण्यात येणार आहेत. प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या लाऊडस्पीकरवरच या निर्णयाचा परिणाम होईल. अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार अशा मंदिर, मशीद आणि गुरुद्वारांचा शोध घेतला जात आहे.

याबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्य गृहसचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे दिले आहेत. त्यामुळे यूपीत आता मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा या सर्व ठिकाणी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. असं केल्यास लाऊडस्पीकर जप्त केला जाईल, शिवाय कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागेल. नियम मोडणाऱ्या स्थळांची ओळख पटवण्याची मुदत 10 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती