एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. लोणावळा शहराची आजमितीला लोकसंख्या 57 हजार 698 असून, बाहेरून फिरायला येणाऱ्या पर्यटकांची दैनंदिन सरासरी संख्या 13 हजार 321 इतकी आहे. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला. यापूर्वी 2018 साली लोणावळा नगरपरिषद सातव्या व 2019 साली दुसऱ्या क्रमांकावर होती.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने 163 कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, संस्थांमधील पुरुष, महिला व मुले मिळून 18 हजार 302 जणांनी सहभाग नोंदविला होता. शौचालय सुविधेच्या बाबतीन 2019 साली लोणावळा नगरपरिषदेला ओडीएफ+ व 2020 साली ओडीएफ++ दर्जा मिळाला आहे. शहरात 40 सार्वजनिक शौचायले असून यापैकी 10 शौचालयांना स्टार दर्जा प्राप्त आहे. या व्यतिरिक्त0 524 शौचालयांसाठी अनुदान देण्यात आले होते.