विवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहणे कायद्याने गुन्हा

जर विवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी हा निर्णय दिला आहे. तर हाय कोर्टाने चांगलेच फटकारले असून  विवाहीत स्त्री किंवा पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे, सामाजिक गुन्हा असल्याचे म्हटले आहे. जर कोणी असे राहत असेल तर त्या विरोधात आणि  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही उच्च न्यायालायाने दिल्या आहेत.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, वैवाहिक जीवनात स्त्री अथवा पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे, आपल्या जोडीदाराची फसवणुक असल्याचे निकाल पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली पाहिजे, असे सांगितले आहे.
 
सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामध्ये अविवाहीत, घटस्फोटीत, विधवा अथवा विदूर व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोर्ट निर्णय आणि कायद्याचा असा कोणी काहीही अर्थ काढत असले तर त्याच्यावर कारवाई होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा